breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! डोळ्यांसमोर नदीत वाहून गेला मित्र, मदतीसाठी पाण्यात उतरलेल्या तिघा मित्रांचाही मृत्यू

फारुखाबाद: सोमवती अमावस्येनिमित्त गंगा घाटावर स्नान करण्यासाठी गेलेल्या चार मित्रांच्या आज जीवावर बेतली आहे. अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान पवित्र समजलं जात असते. ते चारही मित्र घाटावर स्नान करण्यासाठी गेले होते. त्यातला एक मित्र सर्वांच्या आधी नदीमध्ये उतरला होता. कुठलाही अंदाज न घेता तो खोल पाण्यात जात होता. त्याला वाचविण्यासाठी इतर तीन मित्रही पाण्यात गेले आणि तेही बुडाले.

यातल्या तीन जणांना जलसमाधी मिळालेली आहे. तर एकाला वाचविण्यात यश आलं आहे. नदीच्या काठावर स्नान करण्यासाठी गर्दी होती. त्यात हे मित्र स्नानासाठी पोहोचले. पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि खोलीही जास्त होती. त्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. आपला जीवलग मित्र वाहत असल्याचं दिसताच ते तीनही मित्र नदीच्या पाण्यात उतरले होते.

मात्र सगळेच पाहण्यात वाहत गेले. तोपर्यंत काठावर एकच गोंधळ उडाला होता. तिथे उपस्थित असलेल्या काही मच्छिमारांनी त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलं आहे. तर इतर तिघांचे मृतदेह मात्र सापडले नाही. शेवटी अनेक तासांच्या बचाव कार्यानंतर त्या तिघांचेही मृतदेह मिळाले आहेत. सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांनी नदीच्या गर्दी केली होती. कोरोनामुळे लोकांनी गर्दी करू नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाने केलं होतं मात्र त्याचं पालन लोकांनी केलं नाही.या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी भाविकांना घाट सोडण्यासाठी विनंती केली. त्यानंतर घाटावरची गर्दी कमी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button