breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथकाची स्थापना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी वाहन चोरी विरोधी पथकाची आज मंगळवारी (दि. 11) स्थापना केली. पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील वाहनचोरीचा कसून तपास केला जाणार आहे. वाहन चोरून त्याची काळ्या बाजारात विक्री करणा-या दलालांच्या या पथकाद्वारे मुसक्या आवळल्या जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या वाहनचोरीच्या घटनांची उकल करण्यात येणार आहे. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी हे पथक पूर्णवेळ कार्यरत राहणार आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कामकाज पाहणार आहे.

पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलीस उपनिरीक्षक गिरीष चामले तसेच नऊ पोलीस कर्मचारी नेमले आहेत. सध्या हे पथक पिंपरी पोलीस ठाण्यांतर्गत येणा-या मोहननगर पोलीस चौकीत कार्यरत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 3 चे शंकर बाबर, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कामकाज पाहणार आहे.

सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्यामार्फत पथकाच्या कामकाजाचा आठ दिवसांचा अहवाल पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्यापुढे सादर केला जाणार आहे. जास्तीतजास्त गुन्ह्यांची उकल करण्यात यश आल्यास पथकाला योग्य पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button