breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

धक्कादायक! चार दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांची हत्या; माजी सभापतींवर धारदार शस्त्राने हल्ला

सांगली | महाईन्यूज

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. मनोहर पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण हत्या करण्यात आली. कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथे अज्ञात हल्लेखोरांकडून हा हल्ला करण्यात आला. मनोहर पाटील पंचायत समितीचे माजी सभापती होते. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्रााथमिक अंदाज आहे.

धक्कादायक म्हणजे चार दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती. यांच्या डोक्यात वार करून हल्लेखोरांनी पळ काढलेला होता. हे प्रकरण ताजं असतानाच अजून एक हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे. मनोहर पाटील यांच्यावर बुधवारी संध्याकाळी हा हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शेतात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोहर पाटील यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी मिरज येथील मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button