breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होळीसह धुळवड सणावर संक्रांत

पिंपरी महाईन्यूज

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, रविवारी (दि.28 मार्च) रोजी होळी सण आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी धुळवड हे दोन्ही सण वाढत्या कोरोनामुळे साजरे करण्यावर पुण्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेने बंदी घातली आहे.

आज लॉकडाऊनला वर्षपूर्ती झाली असून राज्यातील बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. मुंबईसह पुण्यात होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहे. राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहत यंदाही पुण्यासह पिंपरी चिंचवडकरांवर धुळवडीचा बेरंग झाला आहे.

महापालिकेने होळी व धुळवड सणासंदर्भातील नियमावली

– पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यानुसार सार्वजनिक ठिकाणी म्हणजे हॉटेल, रिसॉर्ट तसंच मैदाने, मोकळ्या जागा अशा कोणत्याही ठिकाणी होळी पेटवता येणार नाही आणि रंग उडवता येणार नाही.

-हा सण वैयक्तिकरित्याही साजरा करता येणार नाही असेही पत्रकात नमूद केलं आहे

-उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असंही पत्रकात म्हटलं आहे

-गेल्या वर्षी 9 मार्च म्हणजे होळीच्या दिवशीच पुण्यात आणि राज्यातही पहिला कोरोना रुग्ण सापडला होता.

-यंदाही होळी, धुळवडीवर निर्बंध आल्याने सलग दुसऱ्या वर्षी नागरिकांचा बेरंग होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button