breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

लोग रिश्तों में हदें पार करते हैं, मेरा एक ऐसा रिश्ता था…

टायगर श्रॉफच्या ‘बागी ३’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यात प्रेक्षकांना पुन्हा एकदा धमाकेदार एक्शन पाहायला मिळणार आहे. यावेळी एक्शन तिपटीने जास्त असणार आहे. ‘बागी’ सिनेमाच्या प्रत्येक भागात एक्शनचा डोस वाढत नेलेला दिसतो. ‘बागी’ आणि ‘बागी २’ या सिनेमांच्या यशानंतर निर्मात्यांनी आधीच सांगितलं होतं की, ‘बागी ३’ मध्ये टायगर श्रॉफच्या तीनपट एक्शन सीन करताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये हे स्पष्ट दिसतं.

ट्रेलरमध्ये एक्शन, फाइट, प्रेम आणि युद्ध या साऱ्या गोष्टींचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. टायगरचं टोन शरीर आणि एक्शन सीन हे चाहत्यांना सुखावणारं आहे. यासोबतच श्रद्धा कपूर बीपसह काही शिव्या रीमिक्समध्ये देताना दिसणार आहे. तिच्या तोंडातील ही वाक्य ऐकून तुम्हालाही मजा येईल.

सिनेमातील खलनायक म्हणून जमील खोरीने चांगली छाप सोडली आहे. सिनेमात अॅक्शन आणि फाइट सीनमध्ये गाड्या, टॅक, हॅलिकॉप्टर वापरण्यात आले आहेत. या सर्वात ट्रेलर पाहताना टायगर श्रॉफची बॉडी आणि त्याची फ्लेक्सिबिलीटी यांच्यावरून नजर हटत नाही. साजिद नाडियाडवाला यांची निर्मिती असलेला हा सिनेमा अहमद खानने दिग्दर्शित केला आहे. येत्या ६ मार्च २०२० ला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button