breaking-newsताज्या घडामोडी

धक्कादायक!प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यामुळे अंध पतीचा खून करून पेटवले

औरंगाबाद | महाईन्यूज

वैजापूरजवळील तिडी शिवारात एका अंध व्यक्तीचा खून करून मृतदेह पेट्रोलने पेटवून दिल्याचे प्रकरण गुरुवारी उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही तासांमध्ये आरोपींचा छडा लावला. पकडलेल्या शेख यासिन शेख वसीर (रा. कसाबखेडा) याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. मृत अंध सय्यद अशरफ सय्यद नूर याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगत शेख यासिनने मृत हा अडसर ठरत असल्यानेच त्याचा खून केल्याचे मान्य केले, असे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी माध्यमांना सांगितले आहे.

तिडी-सवंदगाव रस्त्यावरील रघुनाथ डुकरे यांच्या शेतात गुरुवारी सकाळी सय्यद अशरफ यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनंनतर वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांच्यासह श्वान पथक, ठसे तज्ज्ञही घटनास्थळी दाखल झाले होते. या वेळी पोलिसांनी घटनास्थळावरून लोखंडी गज, अंधाची काठी, काडेपेटी आणि पेट्रोलची रिकामी बाटली जप्त केली होती. अंध अशरफ यांना पहाटे झोपेतच उचलून आणत खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button