breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यसभेसाठी मनसे आमदाराचा संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा, पाहा काय म्हणाले…

डोंबिवली : संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ आता मनसेने पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. कल्याण ग्रामीणचे आणि मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी संभाजीराजेंना सर्वच पक्षांनी मिळून बिनविरोध पाठविण्याचे आणि पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे, असं ट्वीट केलं आहे. दरम्यान, या ट्वीटमध्ये त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहलं की, ‘राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर ‘सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे’, असं देखील राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वपक्षांनी मिळून मला राज्यसभेवर निवडून द्यावं, असे आवाहन संभाजीराजेंनी केलं होतं. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेने मंगळवारी आपला उमेदवार जाहीर केला. त्यांच्याकडून कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. एकंदरीतच राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संभाजीराजेची एन्ट्री झाल्याने चुरस वाढली आहे. शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजप काय भूमिका घेते, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button