breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धकधक वाढली! दहावीचा निकाल, 11 वाजता मंडळाची पत्रकार परिषद

मुंबई: दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला आणणारा एसएससी बोर्डाचा निकाल अवघ्या काही तासात जाहीर होणार आहे. दहावी बोर्ड परीक्षा निकाल आज (बुधवार 29 जुलै) दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होईल. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात मार्च 2020 मध्ये ही परीक्षा पार पडलेली होती.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध असणार आहे.

‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार…

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button