breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक! लॉकडाऊनपूर्वीच नोकरी गेली, पुण्यात 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या

पुणे : पुण्यातील धायरी येथे एका बावीस वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे. कोमल महादेव बांदल असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. तिने मंगळवारी (28 जुलै) राहत्या घरात आत्महत्या केली आहे. तिने मृत्यूपूर्वी चिट्ठी लिहून आपल्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये असंही लिहून ठेवलं, अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

कोमल तिची आई, वडील आणि भावासोबत धायरी येथे राहात होती. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. बारावीनंतर तिने नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र, लॉकडाऊन पूर्वीच तिचं काम गेलं होते. तिचे वडील आणि भाऊ एका खासगी कंपनीत नोकरी करतात. पीडित कोमलच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सिंहगड पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करित आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button