breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्याची काय पूर्ण देशाचीच निवडणूक घ्या; शरद पवारांचे फडणवीसांना आव्हान

मुंबई |महाईन्यूज|

हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक घेऊन दाखवावीच’, असे आव्हान देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘फक्त राज्याची काय पूर्ण देशाचीच निवडणूक घ्या. आमची काहीच हरकत नाही.’, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुक्ताईनगर येथे बोलताना ‘हिम्मत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’ असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, ‘सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिम्मत असेल तर पुन्हा जनतेच्या कोर्टात जाऊ. पुन्हा निवडणूक घेऊन दाखवावीच’, असे फडणवीस म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button