breaking-newsTOP Newsपुणेमहाराष्ट्रराजकारण

विरोधी पक्षनेते अजितदादा यांच्या हस्ते पिंपळे सौदागर मधील विविध गणेश मंडळातील आरती उत्साहात

पिंपरी-चिंचवड । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

गणेशउत्सवानिमित्त आज महाराष्ट्र राज्याचे माजी उमुख्यंमत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते पिंपळे सौदागर परिसरातील शिवशंभो सेवा मंडळ, क्रांती मित्र मंडळ, क्रांती क्रिडा मंडळ आदी मंडळाच्या श्री गणेशाची आरती आदरणीय दादांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी मंडळांचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजितदादा यांनी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका सौ. शितलताई काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी नाना काटे व शितल काटे यांच्यावतीने दादांचा सत्कार श्री गणेशाची मुर्ती व शाल, पुष्पगुच्छ देवुन करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री. अजित गव्हाणे, माजी आमदार श्री. विलासशेठ लांडे, माजी महापौर श्री. संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक श्री. मयुर कलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button