breaking-newsTOP Newsक्रिडामहाराष्ट्र

Women’s T20 World Cup 2023 : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ सज्ज

Women’s T20 World Cup : शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने अंडर-१९ टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावलं. यानंतर आता महिला संघ टी-२० विश्वचषक २०२३ खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ मौदानात उतरणार आहे.

या विश्वचषकात १० संघ सहभागी असणार आहेत. त्यांना दोन गटात ठेवण्यात आले आहे. अ गटात ऑस्ट्रोलिया, बाग्लादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ आहेत. तर ब गटात भारत, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिड हे संघ असणार आहेत. दोन्ही गटातील अव्वल २-२ संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील.

१० फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान गट टप्प्यातील सामने खेळवले जाणार आहेत. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होणार आहेत. १२ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. सामन्यापुर्वी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने वक्तव्य केलं आहे. हा महत्वाचा सामना आहे, मात्र आमच्या संघाचं लक्ष हा सामना जिंकण्यावर असेलच पण आमचं अधिक लक्ष आयसीसी ट्रॉफीवर असणार आहे, असं कौरने म्हटलं आहे.

महिला विश्वचषकासाठी भारतीय संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋछा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदिका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पुजा वस्त्ताकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button