breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

दोन मुलींना विष पाजून आईची आत्महत्या; सात महिन्यांची चिमुकली बचावली

जव्हार – हाताला काम नाही म्हणून घराच्या कर्त्या पुरुषाने गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येला एक महिना उलटत नाही तोच त्याच्या विधवा पत्नीने दोन मुलींना विष पाजून स्वतःही आत्महत्या केली. नवरा गेला आता मुलींच्या पोटाची खळगी कशी भरायची या विवंचनेत तिने हे पाऊल उचलले. सुदैवाने या घटनेत सात महिन्यांची चिमुकली बचावली असली तरी रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना जव्हार तालुक्यातील खंडोरा गावात घडली असून त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

रुक्साना दांडवा (30) असे आत्महत्या केलेल्या विधवा आईचे नाव आहे. तिच्या नवऱयाने गेल्या महिन्यात 6 जूनला गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने संपूर्ण दांडवा कुटुंब पोरके झाले. पदरात चार मुली, हाताला काम नाही, खायला अन्न नाही. मुलींना कसे जगवायचे या विचाराने रुक्सानाला ग्रासले आणि तिने संपूर्ण कुटुंबच संपवण्याचा निर्णय घेतला. दोन मुली शाळेत गेल्यानंतर रुक्सानाने आपली तीन वर्षांची मुलगी दीपाली व सात महिन्यांची चिमुकली वृषाली यांना विष पाजले व स्वतःही घेतले. यात रुक्साना व दीपाली या दोघांचाही जीव गेला तर वृषाली बचावली. जव्हार येथील कुटीर रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. रुक्सानाची आई लक्ष्मी टोकरे हिच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button