breaking-newsमहाराष्ट्र

चंद्रपुरात एक वाघिण आणि दोन बछड्यांचा मृत्यू

चंद्रपुरातल्या चिमूर वनक्षेत्रात एका वाघिणीचा आणि दोन बछड्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. चिमूर वनक्षेत्रातील मेटेपार गावातल्या नाल्याजवळ हे तीन मृतदेह आढळले आहेत. या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेटेपार गावातला एक गावकरी नाल्याजवळ असलेल्या जांभळच्या झाडाजवळ जांभळं काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला तीन वाघांचे मृतदेह दिसले. याबाबत त्याने तातडीने प्राणी मित्र अमोद गौरकर आणि वन विभागाला माहिती दिली त्यानंतर ही घटना समोर आली आहे.

प्राणीमित्र अमोद गौरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विषबाधा झाल्याने या तीन वाघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. वाघांच्या मृतदेहांशेजारी एक चितळही मृतावस्थेत आढळले. चितळ खाऊन या वाघांना विषबाधा झाली असावी आणि त्यातच त्यांचा अंत झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Maharashtra: Tigress and her two cubs found dead in Chimur Forest area of Chandrapur.

184 people are talking about this

वाघांचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच गावकरी, पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button