breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता बंदूकधारी सुरक्षारक्षकांची गस्त

महाईन्यूज | पुणे

सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात येणाºया समाजकंटकांवर, चोरट्यांवर आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. काही दिवसांपासून विद्यापीठ आवारात २४ तास हे बंदूकधारी गस्त घालनार आहेत. त्याचप्रमाणे पुढील काही महिन्यांत परिसरात ५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. तसेच विद्यापीठात जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी स्वतंत्र गेट बांधण्याचे काम लवकरच सुरू करणार आहे. त्यामुळे उशिरा का होईना विद्यापीठाने आपली सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी लक्ष दिल्याचे बोलले जात आहे.

विद्यापीठाच्या सुमारे ४११ एकरांच्या परिसरात काही ठिकाणी घनदाट झाडी आहे. गेल्या काही महिन्यांतच विद्यापीठ आवारात एका अज्ञात व्यक्तीने एका तरूणावर व तरूणीवर टोकदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली होती. तसेच विद्यापीठातील वसतिगृहात मद्यपान करून काही तरूणांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बंदूकधारी पथकाची नियुक्ती केली असून या पथाकाकडून २४ तास विद्यापीठात गस्त घातली जानार आहे. या पथकामध्ये एका महिला सुरक्षारक्षकही असणार आहे. विद्यापीठात महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ४० नवीन सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले की, विद्यापीठात विविध विभागांच्या आवारात, तसेच परिसरातील रस्त्यांवर सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आता फायबर आॅप्टिकल नेटवर्कच्या माध्यातून विद्यापीठात सेंट्रल कमांड कंट्रोल स्टेशन उभारले जाणार आहे. सुमारे ५०० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून विद्यापीठातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सुरक्षा कर्मचायांना लवकरच व्हिडीओ फोन देण्यात येणार आहे. विद्यापीठाकडून सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button