breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चुकीचा बांधकाम परवाना रद्द करा ; वाकडच्या शेतकरी कुटूंबाचा महापालिकेत आत्मदहनाचा इशारा

बांधकाम परवानगी देण्यासाठी महापालिकेकडून अधिका-यांच्या बिल्डरला पायघड्या
पिंपरी – महापालिकेच्या बांधकाम व नगररचना विभागातील अधिका-यांच्या गलथान कारभाराचा फटका वाकडच्या शेतकरी कुटूंबाला बसला आहे. एका बिल्डरने वाकडला गृहप्रकल्प उभारण्यासाठी सर्व्हे क्रमांक 52/8 मधील जागेची कागदपत्रे जोडून दिली. परंतू, महापालिकेने सर्व्हे क्रमांक 52/8 मधील जागेवर बांधकाम प्रकल्प उभारण्यास परवानगी दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सदरील प्रकल्पाची बांधकाम परवानगी रद्द करावी, अशी मागणी महेश भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
याबाबत वाकड येथील शेतकरी महेश भुजबळ यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “वाकड येथील भुजबळवस्ती येथील सर्व्हे क्रमांक ५०/८ मधील ४३ गुंठे जागा वडिलोपार्जित असून त्या जागेच्या मालकीवरून भावकीत वाद सुरू आहेत. तसेच शिवाजीनगर न्यायालयात दावाही दाखल आहे. तत्पूर्वीच पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व्हे क्रमांक ५०/८ मधील ४३ गुंठे जागेत बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. त्या परवानगीची माहिती नगररचना व बांधकाम विभागाच्या संबंधित अधिका-यांना मागतिली असता ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
त्यामुळे सदरील बांधकाम परवानगीची माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविण्यात आली. त्यामध्ये नगररचना विभागाने वाकडमधील सर्व्हे क्रमांक ५२/८ मधील जागेची कागदपत्रे जोडून सर्व्हे क्रमांक ५०/८ मध्ये बांधकाम करण्यासाठी पियुष ठक्कर या बिल्डरला परवाननी दिल्याचे उघडकीस आले. त्याच आधारावर सदरील जागेवर गिरीराज ग्रॅण्डीओस या नावाच्या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. ही बाब नगररचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यांनी “तुमची जमीन कुठे पळवून नेत नाही. तो बिल्डर तुमचे काम सोपे करतोय, असे उत्तर दिले आहे.”
दरम्यान, याविषयी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना माहिती देवून त्यांनी कार्यवाही केलेली नाही. परंतू, त्याच सर्व्हे क्रमांक ५०/८ मधील जागेत संबंधित बिल्डराला बांधकामांसाठी एफएसआय देण्याची कार्यवाही सुरू आहे. एफएसआय मिळविण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही पूर्ण न केल्याची लेखी हरकत नगररचना विभागाकडे नोंदविली होती. त्यावर सुनावणी घेण्याचे नाटक करुन  आमची हरकत नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर यांनी फेटाळली. त्यामुळे आमची फसवणूक झाली असून, नगररचना विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे आम्हाला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे.
तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी देणा-या संबंधित अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच सर्व्हे क्रमांक ५०/८ मधील जागेवर बांधकामासाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी. अन्यथा संपूर्ण कुटुंबासह महापालिकेसमोर आत्मदहन करु, असा इशारा भुजबळ कुटुंबियांनी दिला आहे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button