breaking-newsराष्ट्रिय

देशात गेल्या २४ तासांत ३७,१४८ कोरोनाचे नवे रुग्ण

मुंबई : देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत देशात ३७,१४८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. आतापर्यंतचा देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख ५४ हजाराच्या पार गेला आहे. तर यामध्ये आतापर्यंत  २८,०९९ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

११,५४,९१७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामधील ७,२४,७०२ लोकं कोरोनावर मात करून सुरक्षित आहेत. देशभरात ४,०१,७१२ कोरोना ऍक्टिव केसेस आहे. तसेच महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ८,२४० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा हा ३,१८,६९५ इतका आहे. 

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजाराहून अधिक झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ३,१८,६९५ कोरोनाबाधित आढळले आहेत. यासोबतच राज्यात १७६ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत १२,०३० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ९,५१८ रुग्ण आढळून आले होते. यानंतर आता महाराष्ट्राचा मृत्युदरही देशात सर्वाधिक असल्याची बाब निदर्शनास आली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ११,८५४ नागरिक बळी पडले आहेत. सध्या राष्ट्रीय पातळीवरील कोरोनाचा मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. मात्र, महाराष्ट्रात हाच दर ३.८२ टक्के आहे. राज्याच्यादृष्टीने ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे सांगितले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button