breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस १ फेब्रुवारीपासून सुरू होणार

मिरज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले नऊ महिने बंद करण्यात आलेली कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू केली जाईल अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी काल मिरज जंक्शनला भेट देऊन स्थानकाची पाहणी करताना दिली .
मात्र, मिरज- कोल्हापूर, मिरज- पुणे, मिरज- बेळगाव, मिरज- पंढरपूर या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याबाबत संजीव मित्तल यांनी कोणतेही भाष्य केले नाही. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे यांनी महाव्यवस्थापकांना प्रवासी सुविधांसह विविध मागण्यांचे निवेदन दिले.मित्तल यांच्या पाहणी दौऱ्यासाठी गेले दोन महिने रेल्वे प्रशासनाची तयारी सुरू होती. मिरज स्थानकात प्लॅटफॉर्म व स्थानक परिसर चकाचक करण्यात आला होता. रेल्वे अधिकारी व कर्मचारी गणवेशात उपस्थित होते. सकाळी १० वाजता जीएम स्पेशल रेल्वे मिरज स्थानकात दाखल झाली. महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्यासोबत मिरज रेल्वेस्थानकातील विद्युतीकरण, पादचारी पूल, रनिंग रूम, लिफ्ट, प्रतीक्षालय, स्थानकातील इतर विकासकामांची पाहणी केली. रेल्वे कर्मचाऱ्यांना सिग्नल यंत्रणा कीटचे वाटप केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button