breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

मुकादमांकडून शेतकऱ्यांची ३४ कोटींची फसवणूक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला इशारा

कोल्हापूर : जिल्ह्यात ऊसतोड मजूर आणि टोळी मुकादमांकडून तब्बल ३४ कोटी ६६ लाख ८७ हजार ९८३ रुपयांची फसवणूक झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ४४५ फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये दोन दिवाणी दाव्यांचाही समावेश आहे.

ऊसतोड मुकादमांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या घटना उघडकीस येत हेत्या. हे लक्षात घेता कोल्हापूर जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेतून फसवणुकीचे आतापर्यंत इतके गुन्हे उघडकीस आले आहेत. एकूण ३४ कोटी ६६ लाख ८७ हजार १९३ रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा – पुणे लोकसभा निवडणूकीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले..

उसाचा अंतिम हप्ता तीनशे रूपये मिळवा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादन शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्या समोर भर उन्हामध्ये कारखान्याच्या गेटवर बसून, शेतकऱ्यांनी खर्डा भाकरी जाऊन हे आंदोलन केले. उसाचा उत्पादन खर्च टनामागे २०० ते २५० रूपये वाढला आहे. असे असताना ऊसाला भीमाशंकर कारखाना आणि विध्नहर सहकारी साखर कारखाना देत असलेला दर खूपच कमी आहे. यावर्षी अंतिम हप्ता तीनशे रूपये न दिल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button