breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुख्याध्यापिकेने शाळेच्या अध्यक्षावर केला बलात्काराचा गंभीर आरोप

पिंपरीतील एका प्रतिष्ठीत शाळेच्या मुख्याध्यापिकेने व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षावर बलात्काराचा आणि लैंगिक सुखासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. समितीमधील अन्य सदस्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी अध्यक्षालाच साथ दिली असा आरोप मुख्याध्यापिकेने केला आहे. पुणे मिररने हे वृत्त दिले आहे. जुलै २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत आपल्याला त्रास देण्यात आला असे या मुख्याध्यापक महिलेने म्हटले आहे.

पिंपरी पोलिसांनी अध्यक्ष, शाळेचे पर्यवेक्षक, व्यवस्थापन समितीचे समन्वयक आणि विकास अधिकारी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. सदर मुख्याध्यापिक १९९४ पासून शाळेमध्ये नोकरी करत आहे. अध्यक्षाने जुलै २०१७ पासून लैंगिक सुखासाठी आपल्याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्यासमोर जाणे टाळण्यासाठी आपण बैठकीला प्रतिनिधी पाठवला तर आपला पाणउतारा केला जाई. शाळेतल्या वरिष्ठांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष केले आणि मलाच नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली असे या मुख्याध्यापिकेने सांगितले.

एक मे रोजी पीडित मुख्याध्यापिकेने शाळेतल्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तिला काय त्रास सहन करावा लागतोय त्याची अन्य सहकाऱ्यांना कल्पना दिली. तिला कर्मचारी नैतिक आधार देतील अशी अपेक्षा होती. पण तसे काही घडले नाही. १२ एप्रिल २०१८ रोजी अध्यक्ष माझ्या कक्षात आले व त्यांनी माझा पाणउतारा केला. सांगितलेले ऐकले नाही तर पाचवी आणि नववीच्या मुलांना कॉपी करण्यासाठी मी कसे प्रोत्साहन दिले तो माझा फोटो सार्वजनिक करण्याची त्यांनी मला धमकी दिली. त्यानंतर त्यांनी माझ्यावर लैंगिक जबरदस्ती केली असा आरोप मुख्याध्यापक महिलेने केला आहे.

पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठीही आपल्याला संघर्ष करावा लागला. आपण ज्यांची नावे घेतली ते समाजातील प्रभावशाली लोक असल्यामुळे पोलीस एफआयआर नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत होते. अखेर जुलै महिन्यात चौघांविरोधात कलम ३५४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला. नंतर पोलिसांनी बलात्काराचे ३७६ कलम एफआयआरमध्ये जोडले. सध्या या प्रकरणाच्या तपासात समाधानकारक प्रगती झालेली नाही. पोलीस त्यांचे काम व्यवस्थित करत नाहीयत असे तक्रारदार महिलेच्या वकिलाने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button