breaking-newsराष्ट्रिय

कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा, लष्करप्रमुखांची कमांडरांना सूचना

नवी दिल्ली – भारत -चीन या दोन्ही देशांदरम्यान तणाव दिवसेंदिवस वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लष्काराच्या कमांडरांना कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. लष्करासोबतच हवाई दलानेही लडाख, उत्तर सिक्कीम, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश क्षेत्रातील संपूर्ण एलएसीवर ऑपरेशनल स्तरावर तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजेच, कोणत्याही परिस्थितीत त्वरित कारवाईसाठी पूर्णपणे तयार रहावं.

तेजपूर येथील चौथ्या कोअर मुख्यालयालाचा दौऱ्यावर असताना लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी कमांडर्सना ही सूचना दिली. लष्कराच्या चौथ्या कोअरवर अरुणाचल प्रदेश क्षेत्रातील चीनच्या सीमेवर देखरेखीची जबाबदारी आहे. ‘सैन्यप्रमुखांनी आपल्या सर्व कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास आणि आघाडीवर उच्च पातळीवरील ऑपरेशनल तयारी ठेवण्यास सांगितले आहे, असं लष्कराच्या सूत्रांनी सांगितल्याचं एनआयएन म्हटलंय. लष्कर प्रमुख दोन दिवसांच्या पूर्वे कमांडच्या दौर्‍यावर होते. त्यांनी एलएसी आणि सीमेपलिकडील हालचाली कामांवर भारतीय आणि चिनी सैन्याच्या तैनातीची माहिती घेतली.

चीनने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या एलएसीजवळ मोठ्या संख्येने सैनिक तैनात केले आहेत. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमधील सुरू असलेला तणाव दीर्घकाळ सुरू राहण्याची शक्यता आहे. हा ताणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशात नुकत्याच झालेल्या लष्करी स्तरावरील चर्चेत चीनने फिंगर एरियातून पूर्णपणे हटण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल एच.एस. अरोरा यांनी शुक्रवारी लडाखमधील हवाई दलाच्या तळावा भेट दिली. तिथे त्यांनी तयारीचा आढावा घेतला. त्यांनी चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टरही उडवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button