breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: Good News! वेळीच निदान झाल्यास चिंता नाही!

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या ७७ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार

मुंबई : खार येथे राहणाऱ्या ७७ वर्षीय सुषमा (नाव बदलले आहे) यांना करोनाची लागण झाल्याचे निदान वेळेत केले गेले. उच्च रक्तदाबाचा  त्रास असूनही वेळेत उपचार मिळाल्याने सुषमा यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली आहे. परिणामी चारच दिवसांत त्या बऱ्या होऊन सुखरूप घरी परतल्या आहेत.

सुषमा यांना २८ मार्चपासून कोरडा खोकला सुरू झाला होता. खासगी प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर त्यांना संसर्ग झाल्याचे समजले. रात्री उशिरा हा अहवाल आल्यानंतर सुषमा यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची हालचाल सुरू झाली. ‘आईला संसर्ग झाला ही आमच्यासाठी धक्कादायकच बाब होती. सुरुवातीला आम्ही दक्षिण मुंबईतील काही खासगी रुग्णालयांकडे धाव घेतली. परंतु तेथे गेल्यानंतर जागा उपलब्ध नसल्याने अखेर मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात पहाटे ३ वाजता पोहचलो.  आईचे वय बघता रुग्णालयाने तिला दाखल करून घेतले. तिला रात्री एकटे सोडून येताना थोडी भीती वाटत होती. परंतु तिथल्या डॉक्टरांनी धीर दिल्याने मोठा आधार वाटला,’ असे सुषमा यांच्या मुलाने सांगितले.   सुषमा यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. ४ एप्रिलला त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतरही प्रकृतीमध्ये विशेष बिघाड झाला नाही. ‘संसर्गाची सुरुवात असतानाच तिला औषधोपचार सुरू झाले. तिची प्रतिकारशक्तीही उत्तम कार्यरत असल्याने ८ एप्रिलला ठणठणीत बरी होऊन ती घरीदेखील परतली,’ असे त्यांच्या मुलाने सांगितले.

संसर्गाचा स्रोत अस्पष्ट

सुषमा यांचा नातू प्रशिक्षणार्थी डॉक्टर असून दररोज रुग्णालयात जातो. परंतु याव्यतिरिक्त सुषमा यांच्या घरात कोणीही प्रवास केलेला नाही किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले नाही. त्यामुळे त्यांना संसर्ग कशामुळे झाला असेल याचा माग मात्र लागलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button