breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या: शिवसैनिकांनी नागपूर-तुळजापूर मार्गावर केली जाळपोळ करुन वाहतूक रोखली

यवतमाळ |

यवतमाळ बाजार समिती संचालक आणि शिवसेनेचे पदाधिकारी सुनील डिवरे यांच्या हत्येनंतर भांबराजा आणि परिसरातील लोक संतापलेत. शिवसैनिकांनी आणि गावकऱ्यांनी नागपूर-तुळजापूर मार्गावर आज दुपारच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणामध्ये तातडीने कारवाई करावी आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास सुनील डिवरे यांची काही अज्ञात व्यक्तींनी राहत्या घरात घुसून हत्या केली. त्यानंतर या परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.

  • घडलं काय?

यवतमाळ जिल्ह्यातील भांबराजा येथील एका शिवसेना पदाधिकाऱ्याची निघ्रृण हत्या करण्यात आलीय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या सुनील डिरवे (Sunil Divare Shoot Dead) यांची राहत्या घरात घुसून तीन व्यक्तींनी हत्या केलीय. आधी डिवरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला नंतर कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. तीन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून डिवरेंवर आधी तीन गोळ्या झाडल्या त्यानंतर कुऱ्हाडीने डिवरे यांच्यावर वार केले.

  • गावकऱ्यांची गर्दी…

४० वर्षीय सुनील डिवरे हे स्थानिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय लोकप्रितिनिधी होते. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही होते. डिवरे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी पंचक्रोशीमध्ये वाऱ्यासारखी परसली आणि त्यांच्या घराजवळ गर्दी जमा झाली. हल्ल्या झाल्यानंतर गावकऱ्यांनी डिवरे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने डिवरे यांचा रुग्णालयामध्ये आणण्याआधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

  • कारण अस्पष्ट…

डिवरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याची माहिती समोर आलेली नाही. मात्र शासकीय रुग्णालयाबरोबरच डिवरेंच्या घराबाहेर रात्रीपासूनच समर्थकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. भांबराजा परिसरामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

  • चौघांना अटक…

पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. फरार आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करावी अशी मागणी आमदार संजय राठोड यांनी पोलिसांकडे केली. राठोड यांनी डिवरे यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.

  • रस्ता रोको आंदोलन…

या घटनेमुळे शिवसैनिक संतप्त झाले असून त्यांनी आज नागपूर-तुळजापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन केलं. यावेळी काही ठिकाणी टायर जाळून काही वेळासाठी वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या आंदोलनामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button