breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

काळवीट शिकारप्रकरणी सलमान खान कोर्टात गैरहजर

जोधपूर – काळवीट शिकार प्रकरणाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी अभिनेता सलमान खान आज जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहू शकला नाही. त्यामुळे यावरील सुनावणी आता ६ फेब्रुवारीला होणार आहे. त्यावेळी सलमानला कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

वाचा :-‘कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा ना संत्री’, गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

काळविट शिकार प्रकरणात सलमान खानला दोषी ठरवून कनिष्ठ न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा निर्णय न्यायालयाने ५ एप्रिल २०१८ रोजी जाहीर केला. त्याच्याविरोधात सलमानने जोधपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे ७ एप्रिल २०१८ रोजी सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देऊन त्याला सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणाची आज सुनावणी होती. परंतु सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सलमान न्यायालयात हजर राहू शकत नाही, असे त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार आजची सुनावणी तहकूब झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button