breaking-newsराष्ट्रिय
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 15लाख 31 हजारांवर
हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 लाखांच्या पार पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात 48513 रुग्ण आढळले असून 768 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 15लाख 31 हजारांवर पोहोचला आहे. यातील 5,09,447 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 9,88,030 रुग्ण बरे झाले आहेत. तर 34,193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 4 लाख चाचण्या झाल्या आहेत तर आतापर्यंतचा चाचण्यांचा आकडा हा 1.7 कोटींवर पोहोचला आहे.