breaking-newsमहाराष्ट्र

#CoronaVirus:लातूरमध्ये एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोना

मुंबई : कोरोनाच्या विषाणूने कुटुंब स्तरावर संसर्ग करण्यास सुरुवात केल्याची दोन मोठी उदाहरणं समोर आली आहेत. लातूरमध्ये एकाच कुटुंबातल्या 10 जणांना जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे . त्यामुळे लातूर आणि अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या लातूरमधील कोरोना रुग्णांचा आकडा 129 वर पोहचली आहे.

लातूरमध्ये आडत व्यापाऱ्याच्या घरात व्यापाऱ्यासह 10 जणांना कोरोना झाला. सुरुवातीला संबंधित आडत व्यापाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्याही कोरोना चाचणी करण्यात आल्या. यात इतर सदस्य देखील कोरोना बाधित असल्याचं समोर आलं. यानंतर लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता 129 वर गेली आहे. लातूरमध्ये आतापर्यंत 61 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर एकूण 66 जण उपचार घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button