breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत अनलॉकमुळे कोरोनाचं प्रमाण पुन्हा पुर्ववत होत असल्याचं चित्र

मुंबईत काही प्रमाणात कोरोनाचं प्रमाण कमी झालं आहे असं म्हणत असतानाचं आता पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाचं प्रमाण पुर्ववत होत असल्याचं पहायला मिळत आहे. अनलॉक सुरू करण्यात आल्यानंतर नागरिकांचा मुक्त संचार वाढला. त्यामुळे करोनाचा संसर्ग झपाट्याने प्रसार होण्यास पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. शिवाय नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही. मास्क विनाकारण बाहेर पडण्याचं प्रमाणही वाढल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढलीये. पण फक्त मास्क लावल्यानं कोरोनाच प्रमाण कमी होत अस नाही.

राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहेत. आश्चर्य म्हणजे मुंबईत ज्या ठिकाणी कोरोनाच कहर नव्हता त्या ठिकाणी कोरोनाने थैमान घातलं आहे. धक्कादायक म्हणजे सोसाट्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून झोपडपट्ट्यांमध्ये तुलनेने ही संख्या कमी असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अनलॉक सुरू झाल्यानंतर करोनाबाबतची परिस्थितीच उलटी झाली आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सोसायट्यांमधील करोना रुग्णांच्या संख्येत १०८ टक्के वाढ झाली आहे. तर झोपडपट्ट्यांमधील करोना रुग्णांच्या संख्येत ६० टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात वरळी, भायखळा, धारावी, वडाळा आणि मलबार हिल परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडले होते. तर बोरिवली, मालाड, कांदिवली, दहिसर, भांडूप, मुलुंड आणि घाटकोपर परिसर सुरक्षित मानला जात होता. मात्र, ऑनलॉकच्या प्रक्रियेने गणितच बदलून गेलं आहे. आता धारावी, वरळी, भायखळा आणि मलबार हिलमधील कोरोना रुग्णांचं प्रमाण कमालीचं घटलं आहे. तर उत्तर मुंबई, पश्चिम उपनगर आणइ पूर्व उपनगरात करोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button