breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दुर्गा टेकडी परिसरात सकाळच्या वेळी महापालिका रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा पुरवणार

– अमित गोरखे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी | प्रतिनिधी
दुर्गा टेकड़ी परिसरात मॉर्निग वॉकच्या वेळेत रुग्णवाहिका व् वैद्यकीय कर्मचारी यांची सोय करण्याची मागणी अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे. या परिसरात मॉर्निग वॉकच्या दरम्यान रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचारी सेवा देण्यात येणार आहे. गोरखे यांना अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी पत्र देऊन ही माहिती दिली.

दुर्गा टेकड़ी परिसरात मॉर्निग वॉकच्या वेळेत अनेक ठिकाणावरून नागरिक येत असतात. अनेक वेळा या ठिकाणी हृदयविकराचा झटका येऊन नागरिक मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना पाहता या परिसरात रुग्णवाहिका व् वैद्यकीय कर्मचारी यांची सोय करण्याची मागणी अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी केली होती. त्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे त्यानी पत्रव्यवहार केला होता.

त्याची दखल घेत वैद्यकीय विभाकडून त्यांना रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचारी सेवा देण्यासाठी उपलब्ध करणार असल्याची माहिती पत्राद्वारे दिली. सकाळी ६ ते ९ या वेळेत ही सोय करुन देण्यात येणार आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरु असून आपल्याला कळवू, अशी माहिती वैद्यकीय विभागाने गोरखे यांना पत्राद्वारे दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button