breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘सार्वजनिक सुरक्षेसाठी अनियंत्रित भंगार व्यवसाय तातडीने बंद करा’; संजीवन सांगळे

पिंपरी | चिखली, कुदळवाडी तसेच इंद्रायणी नदीच्या परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये प्लास्टिक, कागदी पुठ्ठा, लाकूड या ज्वलनशील वस्तूंची भंगार खरेदी विक्रीची दुकाने आणि मोठी गोदामे आहेत. या परिसरात गेले काही वर्षे वारंवार आगी लागून मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर घातक वायूंचे प्रदूषण झालेले आहे आणि होत आहे, पिंपरी चिंचवड मनपा आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांचेकडे किती आगी आणि का लागल्या याचा तपशीलवार लेखाजोखा आहे.

मात्र सर्व सुरक्षा आणि पर्यावरण नियमांचे उलंघन करणार्‍या या दुकानाकडे मनपा आणि संबंधित सरकारी खात्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे येथे वारंवार आगी लागतात, नागरिकाना श्वसनाचे त्रास होतो, त्यामुळे ही सर्व भंगार मालाची दुकाने तातडीने बंद करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र भंगार प्रोसेस पार्क एम आय डी सी च्या अखत्यारीत द्यावा, अशी मागणी चिखली – मोशी – पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना एका निवेदना द्वारे केली आहे.

हेही वाचा     –    भगवा ध्वज नाचवत खासदार बारणे यांचा श्रीराम नवमी शोभायात्रांमध्ये सहभाग 

याबाबत माध्यमांशी बोलताना संजीवन सांगळे यांनी सांगितले की, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण खात्याने धोकादायक मानवी आरोग्य आणि नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कारखान्यातील वस्तू, उपपदार्थ यांची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष कायदे आणि नियम केलेले आहेत.

चिखली कुदळवाडीतील भंगार दुकानात टाकाऊ कागद, कागदी वस्तू व वेष्टने, काच, रबर, धातू, रंग-गाळ, तेल, राख, जड धातू, टाकाऊ दूरदर्शन संच, म्युझिक सिस्टिम्स, रेडिओ, मोबाईल फोन, संगणक, वापरलेले युनिफॉर्म, हातमोजे, पायमोजे, बूट ई वस्तूची भंगार श्रेणीत वर्ग केलेल्या औद्योगिक स्क्रॅप असते, या दुकानांच्या आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात विकसित रहिवासी नागरी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

परिसर स्वच्छता, स्वच्छ भारत अभियान,स्मार्ट सिटीच्या संकल्पना आणि शासनाचे एकूण पर्यावरण स्नेही व मानवी वस्तीला सुखकर सुरक्षित ठेवण्यासाठी रहिवासी झोन मध्ये स्क्रॅप संकलन,विघटन, वर्गीकरण दुकाने असता कामा नयेत, अशा मुले मोठ्या आगी लागून धोकादायक स्थिती (unsafe condition) कायम राहते, आग विझवण्यासाठी चिखली, कुदळवाडीत सतत अग्निशामक दल येणे हे नित्याचे झाले आहे,त्यामुळे ही सर्व दुकाने तातडीने बंद करून त्यांना व्यवसायासाठी स्वतंत्र स्क्रॅप प्रोसेसिंग पार्क द्यावा,अशी मागणी संजीवन सांगळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button