breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

देशात २४ तासांत २ लाख ८ हजार नवे रुग्ण, मृतांचाही आकडा वाढला

नवी दिल्ली – गेल्या चार दिवसांपासून मंदावलेली रुग्णसंख्या आज पुन्हा एकदा वाढली आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ८ हजार ९२१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, कालच्या दिवसात 4 हजार 157 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले, त्याचप्रमाणे कोरोनाबळींच्या संख्येतही वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे लसीकरण झालेल्या नागरिकांच्या संख्येने वीस कोटींचा आकडा ओलांडला आहे.

गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 8 हजार 921 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 157 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 95 हजार 955 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 71 लाख 57 हजार 795 वर गेला आहे. देशात 2 कोटी 43 लाख 50 हजार 816 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 11 हजार 388 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 24 लाख 95 हजार 591 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 20 कोटी 6 लाख 62 हजार 456 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,08,921

देशात 24 तासात डिस्चार्ज – 2,95,955

देशात 24 तासात मृत्यू – 4,157

एकूण रूग्ण – 2,71,57,795

एकूण डिस्चार्ज – 2,43,50,816

एकूण मृत्यू – 3,11,388

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 24,95,591

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button