breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, २० दुचाकी घेतल्या भोसरी पोलिसांनी ताब्यात

पिंपरी – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी भागात दुचाकी चोरून त्या विकणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केलं आहे. त्यांच्याकडून एकूण ८ लाख ५५ हजार रुपयांच्या २० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. विशेष म्हणजे भोसरीतील एका माजी पोलीस कर्मचाऱ्याची बुलेट याच टोळीतील एकाने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. याप्रकरणी पाच जणांना अटक केली असून तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीचे ११ गुन्हे भोसरी पोलिसांनी उघड केले आहेत.

रामेश्वर विलास खंदारे (२५), अनिल तबा काळे (१९), ओंकार रमेश चव्हाण (२१) रामेश्वर परमेश्वर भिसे (२१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील घरासमोरील तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी हँडल लॉक तोडून आरोपी चोरायचे. दुचाकी ग्रामीण भागात तसेच शहरी भागात कमी किंमतीत विकायचे तर यातील काही आरोपी हे दुचाकी वापरून सोडून द्यायचे अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे.

यातील एक बुलेट ही भोसरी पोलीस कर्मचाऱ्याची असून आता ते सेवा निवृत्त झाले आहेत. भोसरी पोलिसांनी पाच आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण २० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्यांची किंमत ८ लाख ५५ हजार रुपये आहे. त्याचबरोबर भोसरी पोलिसांनी अकरा गुन्हे ही उघड केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button