breaking-newsराष्ट्रिय

दिल्ली राजधानी परिसरातील हवेचा दर्जा आणखी ‘खालावलेला’

नवी दिल्ली : दिल्ली राजधानी परिसरातील अनेक भागात हवेचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे बुधवारच्या निरीक्षण नोंदीतून दिसून आले आहे. १० मायक्रोमीटर व्यासाच्या कणांचे प्रमाण हवेत जास्त प्रमाणात होते असा याचा अर्थ आहे.

दिल्लीचा हवा दर्जा निर्देशांक २९९ होता तो खराब दर्जाकडे झुकणारा आहे. मंगळवारी हा निर्देशांक सायंकाळी चार वाजता २७० होता.  एकूण ३७ हवा निरीक्षण केंद्रांच्या माहितीनुसार दिल्ली राजधानी परिसरात हवेची स्थिती खूप खराब दर्जाची होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले की, मुंडका, द्वारका सेक्टर ८, दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ, आनंद विहार, वझीरपूर, रोहिणी, बवाना, अशोक विहार, नेहरू नगर व जहाँगीरपुरी भागात हवा निर्देशांक हा अनुक्रमे ३६८, ३६२, ३५५, ३२८, ३२३, ३२३, ३२०, ३१९, ३१९, ३१८ होता. अलिपूर (३१४), नरेला (३१२), विवेक विहार (३११), सिरीफोर्ट (३०९), सीआरआरआय मथुरा रोड ( ३०४), ओखला फेज २  (३०३), आयटीओ (३०२) याप्रमाणे निर्देशांकाची नोंद झाली. गाझियाबाद (३३७), लोणी देहात (३३५), नोईडा (३१८), बृह नोईडा ( ३१८), या प्रमाणे इतर ठिकाणीही प्रदूषण गंभीर स्वरूपात होते. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रीसर्च म्हणजे सफर या संस्थेने म्हटले आहे की, भाताच्या काढणीनंतर पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले  आहे. बुधवारी यामुळेच पीएम २.५ कणांचे प्रमाण वाढण्यात पिकांचे अवशेष जाळण्याचा सहा टक्के वाटा होता. नासाने दिलेल्या छायाचित्रातही पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटना दिसून आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button