breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

…अखेर बळीराजा जिंकला, नाफेडमार्फत हरभरा खरेदीला सुरुवात

परभणी : नाफेड मार्फत बंद झालेली हरभरा खरेदी शेतकर्‍यांनी एकजुटीने केलेला आंदोलनामुळे आज सोमवारी ३० पासून परत सुरु करण्यात आली आहे. रब्बी हंगाम २०२१-२२ मधील हरभरा हमीभावाने खरेदीबाबत महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, दि विदर्भ सहकारी पणन महासंघाचे कार्यकारी संचालक, महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक, पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी अहमदनगरचे संचालक, वॅपको नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाफेडचे शाखा व्यवस्थापक मुंबई, भारतीय अन्न महामंडळाचे शाखा व्यवस्थापक, मुंबई यांना याबाबत एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

शेतकऱ्यांकडून ६७ लाख १३ हजार ५२५.४५ क्विंटल हरभरा खरेदी…

राज्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी केंद्रशासनाने १७ फेब्रुवारी २०२२ च्या पत्रान्वये एकूण ६ लाख ८९ हजार २१५ मे. टन उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने १ मार्च २०२२ पासून प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत दिनांक २९ मे २०२२ पर्यंत एकूण ३ लाख ६७ हजार ९६९ शेतकर्‍यांकडून ६७ लाख १३ हजार ५२५.४५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

राज्याच्या तिसर्‍या आगाऊ अंदाजाच्या ३२.८३ लाख मे. टन अपेक्षित उत्पादनाच्या आधारे ३० मे २०२२ च्या पत्रान्वये केंद्र शासनाने ७ लाख ७६ हजार ४६० मे. टन सुधारित उद्दीष्ट निश्चित केले असून खरेदीचा कालावधी दिनांक १८ जून २०२२ पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानुसार यापूर्वी निश्चित केलेल्या उत्पादकतेप्रमाणे शेतकर्‍यांकडून हरभरा खरेदी करण्यात यावा. याबाबत सर्व क्षेत्रिय यंत्रणांना कळविण्यात यावे पणनचे सहसचिव डॉ. सुनिव सं. धपाटे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत सुटला, हरभरा हमीभाव केंद्रावर आंदोलन…

दरम्यान, मागील सहा दिवसापासून नाफेड मार्फत सुरू असलेली हरभऱ्याची खरेदी अचानक बंद केली असल्याने शेतकऱ्यांची वाहने केंद्राबाहेर उभी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने परभणीत शेतकऱ्यांचा संयमाचा अंत सुटला होता. परभणी तालुक्यातील पाडेगाव येथील शासकीय हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी हरभरे शिजवून त्याची विक्री वाहनधारकांना करत आंदोलन करण्यात आले होते. लवकर हमी भावाने हरभऱ्याचे खरेदी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला होता. अखेर त्यांच्या आंदोलनाचा विजय झाला आहे.

  • राज्यातील शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत आहेत…

राज्यातील शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत आहेत. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. मागच्या सहा दिवसापासून परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील १७ शासकीय हरभरा हमीभाव खरेदी केंद्र अचानक बंद होती. विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांना हरभरा खरेदीसाठी घेऊन येण्याचे मेसेज करण्यात आले होते. शेतकरी हरभरा विक्रीसाठी केंद्रावर आल्यानंतर अचानक खरेदी केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, नाफेड मार्फत बंद झालेली हरभरा खरेदी शेतकर्‍यांनी एकजुटीने केलेला आंदोलनामुळे आज सोमवारी ३० पासून परत सुरु करण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button