breaking-newsराष्ट्रिय

दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी ४३८८ सीसीटीव्ही कॅमेरे

दिल्ली पोलिसांचे प्रतिज्ञापत्र

दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी ४३८८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, असे प्रतिज्ञापत्र पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केले आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, की दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पस भागात काही महिलांवर वीर्य व मूत्राने भरलेले फुगे फेकून मारण्यात आले होते त्या बाबत काही महिलांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर काही वकील महिलांनी याचिका दाखल केली होती. त्यात असे म्हटले होते, की होळी व नववर्षदिनी महिलांच्या सुरक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात यावीत.

दिल्ली पोलिसांनी मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन व न्या. व्ही. के. राव यांच्या पीठाला सांगितले, की सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अर्थात प्रतिज्ञापत्र दाखल केले असले तरी एक न्यायाधीश अनुपस्थित असल्याने शुक्रवारी सुनावणी झाली नव्हती.

न्यायालयाने १६ मार्च रोजी असा आदेश दिला होता, की पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबतची स्थिती काय आहे या बाबत अहवाल मागवला होता. मूत्र व वीर्य भरलेला फुगा फेकून मारल्याच्या प्रकरणात तक्रारदाराने चौकशीच सहकार्य केले नाही, त्यामुळे त्याचा काही तपास लागू शकला नाही.

दुसऱ्या एका घटनेत एका व्यक्तीला अटक केली होती, पण त्याला जामिनावर सोडण्यात आले. त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. पोलिसांनी सांगितले, की महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात असून त्यांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. महिला पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची मागणीही याचिकादारांनी केली आहे. निनावी तक्रारींसाठी ड्रॉप बॉक्स बसवण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button