breaking-newsताज्या घडामोडीपुणे

युती म्हणजे, ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’ म्हणत, युतीचं विसर्जन करण्याचे आवाहन

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी शिवसेना-भाजप युतीवर कडाडून टीका केली आहे. रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्टमधून युतीवर निशाना साधला.

दोन महिन्यांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्या सभेत लोक कांदा-कांदा म्हणत कांद्याच्या दराबद्दल विचारत होते. परंतु, उद्धव ठाकरे यांनी राममंदिराचा मुद्दा रेटल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. जनतेच्या समस्या समजून न घेता, युतीकडून एकपात्री प्रयोग सुरू आहे. या प्रयोगांमुळे युतीची सत्ता येणार नाहीच, पण खोटेपणाचे प्रयोग पाहुन एखादा आंतरराष्ट्रीय पुरस्कार युतीला नक्की मिळेल, असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला.

परवा कोल्हापूरामध्ये झालेली युतीची सभा पाहता आली. सभेमध्ये मराठी न बोलता येणारी, मराठी न समजणारी लोक गोळा करण्यात आल्याचं एका वृत्तवाहिनीने दाखवलं. आपण नेमकं कशासाठी आलोय हे देखील या लोकांना माहित नव्हतं.

दूसरीकडे काही महिन्यांपुर्वी उद्घव ठाकरेंनी सभा घेतली होती. या सभेत लोक कांदा म्हणून काद्यांच्या भावाबद्दल प्रश्न विचारत होते तर उद्धव ठाकरे राम मंदिराच्याच मुद्यावर बोलत राहिले. एकतर लोकांना प्रश्न विचारता येणार नाहीत, आपण काय बोलतोय हे लोकांना समजणार नाही अशा लोकांना घेव

यावेळी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील विकासाचे मुद्दे शोधा आणि बक्षीसे जिंका अशी स्पर्धा ठेवायला हवी असे रोहित यांनी सांगितले. युती म्हणजे, ‘गोल माल है भाई सब गोलमान है’ म्हणत, युतीचं विसर्जन करण्यास हरकरत नाही, असंही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. रोहित पवार यांच्या टीकेवर शिवसेना-भाजप युतीकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button