breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

विराट-गंभीर वादावर पाकिस्तानी खेळाडूचं मोठं विधान; म्हणाला, कोहलीच्या यशावर गंभीर जळतो..

Virat vs Gambhir : भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद कोणापासून लपलेला नाही. २०१३ मध्ये आयपीएलच्या सामन्यात त्यांच्यातील वादाला सुरूवात झाली होती. त्यानंतर आगामी २०२३ आयपीएलच्या सामन्यात देखील तो पुन्हा एकदा पाहायला मिळाला. दरम्यान, यावरून पाकिस्तानी खेळाडू अहमद शहजादने या वादाला भडकवणारे वक्तव्य केलं आहे.

अहमद शहजाद म्हणाला की, गौतम गंभीर जे काही करतो, त्यातून त्याला विराट कोहलीविषयी इर्षा वाटते. गौतम गंभीर लढण्यासाठी निमित्त शोधत राहतो. यामुळे तो लखनऊ सुपरजायंट्सच्या युवा खेळाडूंचे मन कलुषित करत आहे. मी जे पाहिले ते खरोखरच दु:खदायक होते. अफगाणिस्तानचा तो खेळाडू (नवीन) आणि विराट यांच्यात मैदानावर काय झाले ते मी समजू शकतो. या गोष्टी घडत राहतात, पण तुम्हाला जे समजत नाही ते म्हणजे गंभीर आपल्याच देशवासीयांना का टार्गेट करतो? जो सध्या जगातील सर्वात मोठा खेळाडू आहे.

हेही वाचा – MPL २०२३ : ‘या’ संघाने पटकावले MPL २०२३ चे विजेतेपद

विराट कोहलीविरूद्ध दाखवलेले हावभाव योग्य नव्हते. आयपीएलचा एक ब्रॅड आहे आणि जर कोणी भारतीय सुपरस्टारला काही म्हणत असेल तर याचा अर्थ ड्रेसिंग रूममध्ये द्वेषाचे वातावरण आहे. गौतम गंभीर हा विराट कोहलीच्या यशावर जळतो, असं अहमद शहजाद म्हणाला.

गंभीरला कोहलीसोबत समस्या असल्याचे आम्ही यापूर्वीही पाहिले आहे. त्याने एकदा आपला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोहलीसोबत शेअर केला होता. विराटने तुला त्यावेळी विचारलं का? की त्याला तुझा पुरस्कार देऊन आयुष्यभर शिव्या देण्याचा अधिकार तुला मिळेल? मला वाटते की कोहलीला मिळालेला आदर आणि यश तो पचवू शकला नाही. एवढ्या लहान वयात त्याने जे मिळवलं ते गंभीरला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत मिळवता आले नाही. जर तुम्ही खरोखर मोठे खेळाडू असाल तर ते मनातून तुमच्या हावभावात दिसते. आपली चूक लक्षात घेऊन तिथे माफी मागितली पाहिजे होती, असंही अहमद शहजाद म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button