breaking-newsमहाराष्ट्र

चंद्रकांत पाटील दिसेल त्याला पक्षात बोलवतात – जयंत पाटील

सांगली – चंद्रकांतदादा पाटील सध्या दिसेल त्याला पक्षात बोलवीत असतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी गोटिखडी (ता. वाळवा) येथील सभेत बोलताना लगावला. भाजपचे अनेक आमदार अस्वस्थ असून ते खासगीत बरेच काही बोलतात, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

गोटिखडी येथे ४५ लाखांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ व उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीबाबा पाटील, जि.प.सदस्या सौ. राजश्री एटम, पं.स.सदस्य आनंदराव पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, माजी अध्यक्ष संजय पाटील, सरपंच विजयराव लोंढे प्रामुख्याने उपस्थित होते. वाळवा येथे नुकत्याच झालेल्या सभेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हुतात्मा परिवाराचे नेते वैभव नायकवडी यांना भाजपात येण्याचे आवाहन केले आहे. हा धागा पकडत आ. पाटील म्हणाले, की चंद्रकांतदादांनी आपल्याकडे कोणाला तरी पक्षात येण्याचे आमंत्रण दिल्याचे कळले. मात्र सध्या चंद्रकांतदादा पाटील सध्या दिसेल त्याला पक्षात बोलवीत असतात.

आ. पाटील म्हणाले, भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वत्र बिकट अवस्था आहे. वीज मंडळाने घरगुती, शेती व उद्योगाच्या विजेचे दर चार वेळा वाढविले असूनही त्यांच्याकडे नवीन जोडणीसाठी पैसे नाहीत. ४० लाखांची थकबाकी आहे. कोळसा कसा घ्यायचा? हा प्रश्न आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button