breaking-newsताज्या घडामोडी

दादर-सावंतवाडी ‘तुतारी एक्स्प्रेस ‘विशेष रेल्वेगाडी उद्यापासून सुरू

मुंबई – कोकणसाठी दादर-सावंतवाडी-दादर तुतारी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी उद्या २५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून प्रवाशांच्या सेवेत येईल. ३१ ऑक्टोबपर्यंत त्याचे पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. तर १ नोव्हेंबरपासून पावसाळी वेळापत्रकाऐवजी गाडी नियमितपणे धावेल. त्यामुळे वेळेत काहीसा बदल होत असल्याची माहिती मध्य रेल्वे व कोकण रेल्वेने दिली. आज २४ सप्टेंबरपासून या गाडीचे आरक्षण उपलब्ध झाले आहे.

केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. राज्यांतर्गत धावणारी ही दुसरी गाडी आहे. याआधी सीएसएमटी-मनमाड गाडी सुरू करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक ०१००३ दादरहून दररोज रात्री १२.०५ वाजता २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१००४ सावंतवाडी रोड येथून दररोज सायं १७.३० वाजता २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबपर्यंत सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दादरला पहाटे ०६.४५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ हे थांबे असणार आहेत.

दादर-सावंतवाडी रोड-दादर विशेष गाडी क्रमांक ०१००३ दादरहून दररोज रात्री १२.०५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला सकाळी १०.४० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१००४ सावंतवाडी रोड येथून दररोज सायंकाळी १८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दादरला पहाटे ०६.४५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबे असणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button