breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

WPL 2023 : मुंबई इंडियन्सचा फायनलमध्ये प्रवेश, दिल्लीबरोबर होणार अंतिम लढत

मुंबईची ईसी वोंग हिने वुमन्स प्रिमियर लीगमधील पहिली हॅट्रीक नोंदवली

Mumbai Indians : वुमन्स प्रिमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने युपीचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात मुंबईने युपीचा ७२ धावांनी पराभव केला आहे. आता दिल्ली आणि मुंबई या संघामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. हा सामना रविवारी २६ मार्च रोजी हा सामना खेळला जाणार आहे.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल युपीचा संघ ११० धावांपर्यंत मजल मारु शकला. मुंबईची ईसी वोंग हिने भेदक मारा करत वुमन्स प्रिमियर लीगमधील पहिली हॅट्रीक नोंदवली.

आता दिल्ली आणि मुंबई यांच्यामध्ये रविवारी २६ मार्च रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. दिल्ली की मुंबई वुमन्स आयपीएल कोण जिंकणार याकडे क्रीडा चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button