breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेला इराणचा इशारा; आमच्या 52 ठिकाणांवर हल्ला केल्यास आम्ही त्यांची 140 ठिकाणे नष्ट करू

तेहरान | महाईन्यूज

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला कधीही अधिकृतरीत्या तोंड फुटू शकते, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने आगळीक केल्यास त्यांची 52 ठिकाणे उद्ध्वस्त केली जातील, असा इशारा दिला होता. आता अमेरिकेविरोधात आरपारच्या भूमिकेत पोहोचलेल्या इराणनेही अमेरिकेने हल्ला केल्यास अमेरिकेच्या 140 ठिकाणांना नष्ट करू, असा इशारा दिलेला आहे.

सुलेमानी यांच्या हत्या करण्यात आल्यानंतर त्यांच्या हत्येचा बदला घोषणा इराणकडून करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी रात्री इराण समर्थित मिलिशियाने इराकमधील अमेरिकन दुतावासासह अन्य काही अमेरिकन ठिकाण्यांवर रॉकेट आणि मोर्टारने हल्ले केले होते. तसेच शनिवारी सकाळी ईराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवून युद्धाचे संकेत दिले होते. इराणमधील महत्त्वाची 52 ठिकाणे निशाण्यावर असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला होता. दरम्यान, आता इराणकडून ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देण्यात आले असून, अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांच्या 140 ठिकाणांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा कुद्स फोर्सने दिला आहे. अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांमधील 140 ठिकाणे निश्चित झाली असून, अमेरिकेकडून काही आगळीक झाल्यास अमेरिकेला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात येईल, असे इराणने म्हटलेले आहे.

इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला खामनेई यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्यातरी अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठीच्या पर्यायांपैकी सर्वात दुय्यम पर्याय म्हणून आम्ही क्षेपणास्त्रांची निवड केली आहे. अमेरिकेविरोधात इराण यापेक्षाही अधिक कठोर आणि प्रभावी पाऊल उचलू शकते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button