breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

ठाणे, पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता; मध्य प्रदेश, राजस्थानलाही अतीवृष्टीचा इशारा

पुणे |

पुढील दोन महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक, उत्तर महाराष्ट्रातील काही भागात सरासरीइतका, विदर्भात काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र असं असतानाच दुसरीकडे मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ठाणे आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या परिसरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, असं होसाळीकर यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पुढील काही तासांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असं म्हटलं आहे.

पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. चार जुलैपासून या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

एल-निनो स्थिती..

’प्रशांत महासागरात सर्वसाधारण असलेली एल निनो स्थिती मोसमी पावसाच्या अखेपर्यंत कायम राहणार आहे. प्रशांत महासागरातील स्थितीसह बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा पावसावर परिणाम होतो. ’सध्या हिंदी महासागरातील आयओडी (इंडियन ओशन डायपोल) स्थिती नकारात्मक असून मोसमी पावसाच्या उत्तरार्धातही ती कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button