breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

या महिन्यात आयपीओ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

मुंबई | प्रतिनिधी

मागील वर्षी शेअर बाजार आयपीओंमुळे चर्चेत राहिला. 2021 मध्ये 42 कंपन्यांनी शेअर बाजारात पदार्पण केले. या आयपीओंमुळे बऱ्याच गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळाला. बाजारात लिस्टिंगच्या वेळीही त्यांच्या किंमती खूप वाढल्या होत्या, मात्र आता जानेवारी महिन्यात झालेल्या मोठ्या घसरणीने जवळपास 38 टक्के आयपीओ सपाट झाले आहेत. सध्या परिस्थिती अशी आहे की, दर तीनपैकी एक आयपीओ विक्री किंमतीपेक्षा कमी दराने व्यवहार करत आहे.

आयपीओमधील सर्वात मोठ्या घसरणीत Zomato, Paytm, Nykaa, CarTrade यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे, ज्यावर गुंतवणूकदारांना मोठा विश्वास होता. BSE आणि NSE वर लिस्टिंग होण्यापूर्वी या कंपन्यांनी त्यांच्या किरकोळ आणि अँकर गुंतवणूकदारांकडून 18 बिलियन डॉलरपेक्षा जास्त रक्कम उभारली होती, जी भारतीय शेअर बाजारात आजपर्यंतचा विक्रम आहे. मात्र सोमवारी दोन महिन्यांतील सर्वात मोठ्या घसरणीदरम्यान झोमॅटोचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले. तर Nykaa 13 टक्क्यांनी आणि Paytm 4 टक्क्यांनी घसरला. तसेच 2021 मध्ये सर्वात मोठा आयपीओ आणणाऱ्या Paytmच्या शेअरची किंमतही त्याच्या उच्चांकावरून 50 टक्क्यांहून अधिक खाली आली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या निराशा आहे. दरम्यान, मार्च 2020 नंतर भारतीय आयपीओ बाजाराला या महिन्यात सर्वात जास्त संकटाचा सामना करावा लागला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button