breaking-newsआंतरराष्टीय
दक्षिण आफ्रिकेचे वाणिज्यमंत्री इब्राहिम पटेल यांना कोरोनाची लागण
केप टाऊन – दक्षिण आफ्रिकेचे वाणिज्यमंत्री इब्राहिम पटेल यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची बाधा होणारे देशाचे ते चौथे मंत्री ठरले आहेत.
इब्राहिम यांची प्रकृती ठिक असून कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच ते स्वतः विलगीकरणात गेले आहेत. घरातूनच ते स्वतःचे कामकाज हाताळणार आहेत. मंत्र्याच्या संपर्कात आलेले लोकही विलगीकरणाचे पालन करत आहेत. सर्वांना स्वतःची चाचणी करवून घेण्यास सांगण्यात आल्याची माहिती कॅबिनेटच्या प्रवक्त्या फुमला विलियम्स यांनी दिली आहे.