breaking-newsराष्ट्रिय

दिल्लीत कोरोनाचा मृत्यूदर कमी झालाय –मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली – दिल्लीतील कोरोनाच्या मृत्यूचा चढता आलेख रोखण्यात दिल्ली सरकारला यश आले असून जून महिन्यात कोरोना मृत्यूदर ४४ टक्क्यांनी कमी झाला असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून दिली.

केजरीवाल म्हणाले की, कोरोना संकटाच्या सुरुवातीपासूनच हे माझे ध्येय होते की, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी व्हावा. त्यानुसार जून महिन्यात ४४ टक्क्यांनी हा दर कमी झाला. हा आकडा शून्यावर आणायचे असल्याचेही केजरीवाल यांनी टि्वटरवरून सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button