breaking-newsपिंपरी / चिंचवड

संचारबंदीमुळे अडकेले मावळातील ५३ कामगार अखेर स्वगृही परतले!

तळेगाव दाभाडे । महाईन्यूज । प्रतिनिधी

मावळ तालुक्यात संचारबंदीमुळे अडकलेल्या ५३ कामगारांना घेऊन तीन एसटी बस आज भंडारा, नाशिक येथे पाठविण्यात आल्या.
लॉकडाऊनच्या काळात अनेक कामगारांना घरी जाण्याची आस लागली होती. त्यामुळे नवलाख उंब्रे, आंबी परिसरातील कामगारांची घरी जाण्याची व्यवस्था करण्यात आली. स्वगृही परत जाण्याचा आनंद सर्व श्रमिकांच्या चेहऱ्यावर दिसुन येत होता. लॉकडाऊनसारख्या अडचणीच्या काळात प्रशासनाकडुन आत्मियतेने झालेल्या सहकार्यामुळे तसेच उपलब्ध करुन दिलेल्या सोयीसुविधांमुळे ह्या कामगारांना त्यांच्या मुळ गावी जाणे शक्य झाले.

यावेळी आमदार सुनील शेळके,  तहसीलदार मधुसुदन बर्गे, गटविकास अधिकारी मा.शरदचंद्र माळी, पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, मंडलाधिकारी संदीप बोरकर, तलाठी होरे भाऊसाहेब, सरपंच दत्तात्रय पडवळ, मा.उपसरपंच संदीप शेटे, दिनकर शेटे, बाळासाहेब शेटे, राजु पडवळ, हनुमंत कोयते, विशाल शेटे, पांडुरंग शिंदे, अनिल बाबर, देविदास पडवळ, अविनाश पडवळ, शांताराम पडवळ, रामभाऊ पडवळ, जालिंदर शेटे, वैभव कार्ले, करण उडाफे, विजय शेटे, शिवनाथ पडवळ, आदित्य येळवंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button