breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थेरगांवच्या आपत्कालिन परिस्थितीच्या चाैकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा आदेश 

पिंपरी – थेरगांव येथील ग क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात सोसायटीसह आजूबाजूला पाणी साचून राहिले. नागरिकांच्या जिवितास व आरोग्य विघातक परिस्थिती धोका निर्माण झाली. त्यामुळे सदरील प्रकरणात निष्काळजीपणा करणा-या दोन उपअभियंत्याना निलंबित करण्यात आले. तसेच या प्रकरणी सखोल चाैकशी करण्यासाठी क्षिसदस्यीय समिती गठीत करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील थेरगाव व परिसरात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच त्या पाण्यामुळे सोसायटीतील व आजुबाजूला धोका निर्माण झाल्याने नागरिकांच्या जिवितास व आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण झालेली होती. सदर परिसरात कार्यरत उपअभियंता संर्वगातील अधिकारी देखील घडलेल्या घटनेच्या दिवशी कामावर उपस्थित नव्हते. तसेच ते फोनही स्विकारत नव्हते.

दरम्यान, आपत्ती व्यवस्थान सारख्या अत्यावश्यक कामकाजामध्ये अडचणी निर्माण झालेल्या असताना दोन्ही उपअभियंत्यांनी हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर सेवा निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच सदरील ठिकाणी एकत्रित झालेले पाणी आणि निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती यास कारणीभूत असल्याचे त्या प्रकरणी सखोल चाैकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांची चाैकशी समिती गठीत करण्यात आली. यामध्ये अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांनी संपुर्ण चाैकशी करुन त्याचा अहवाल पाच दिवसात गोपनिय स्वरुपात सादर करण्याचे आदेश आयुक्त हर्डिकर यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button