Pune : हातात कोयते आणि बंदुक घेऊन मद्यविक्री दुकानावर दरोडा

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी कोयते आणि बंदूकीचा धाक दाखवून मद्य विक्री दुकानात दरोडा घातला. यात तीन लाख रुपयांची रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरल्या आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. रविवारी रात्री सर्वत्र विश्वचषकाच्या सामन्याची रंगत होती. त्याचवेळी अहिर गेट जवळ मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या आर आर वाइन्स दुकानात दरोडा टाकण्यात आला. यात सहा जण होते. त्यात दोघांनी तलवारी हातात घेऊन दहशत माजवली होती.
हेही वाचा – ‘मराठा आरक्षण देण्याची भाजपाची इच्छाच नाही’; ठाकरे गटातील नेत्याची टीका
#Pune | A wine shop robbery on NDA Road in Shivne resulted in the looting of Rs. 3.12 lakh by individuals armed with billhooks (Koytas).
A case has been filed at Uttamnagar police station.
The incident occurred around 9:30 PM when the shop owner was selling liquor to… pic.twitter.com/Ktd22CLEEH
— Free Press Journal (@fpjindia) November 21, 2023
दुकानातील मद्याच्या बाटल्या पिशवीत भरल्या. दुकानातील कामगार आणि ग्राहकांना जीवे मारण्याची धमकी देऊन चोरटे भरधाव वेगाने दुचाकीवरुन पसार झाले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त भीमराव टेळे, सुनील तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर तपास करत आहेत.