breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नामधारी क्षेत्रीय अध्यक्षांना दहा लाख रुपयांचे आर्थिक अधिकार देणार – महापाैर काळजे

पिंपरी – महापालिकेचे आठही क्षेत्रीय अध्यक्ष सध्यस्थितीत नामधारी होते. त्यांना कुठलेही अार्थिक स्वरुपाचे अधिकार नसल्याने विकास कामे करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे पालिकेतील क्षेत्रीय अध्यक्षांच्या अधिकारामध्ये वाढ करण्यात यावी, अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी महापालिका आयुक्तांना केल्या आहेत.

महापालिकेतील आयुक्तांच्या दालनात आज (गुरुवारी) महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग अधिका-यांच्या अधिकार देण्याबाबत बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘अ’ प्रभागाच्या अनुराधा गोरखे,  ‘ब’ प्रभागाच्या करुणा चिंचवडे, ‘क’ प्रभाग नम्रता लोंढे, ड’ प्रभागाचे शशिकांत कदम ‘इ’ प्रभागाच्या भीमाबाई फुगे, ‘फ’ प्रभागाच्या कमल घोलप, ‘ग’ प्रभागाचे बाबासाहेब त्रिभुवन  आणि ‘ह’ प्रभागाचे अंबरनाथ चंद्रकांत कांबळे, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारण समितीच्या सभापती सीमा चौघुले उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 32 प्रभागात आठ क्षेत्रीय कार्यालये स्थापन केलेली आहेत. महापालिका सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी 2017 मध्ये पार पडल्या. त्यावेळी चार सदस्यीय पद्धतीमुळे 32 प्रभाग झाले आहेत. ही प्रभाग रचना होत असताना पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये, तसेच नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करून आठ कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. ही नवीन आठ क्षेत्रीय कार्यालये क्रांतीदिनापासून म्हणजे 9 ऑगस्ट 2017 पासून अस्तित्वात आली आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांना प्रशासनाने कामकाजाच्या सोईसाठी ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’, ‘फ’, ‘ग’ आणि ‘ह’ अशी नावे दिली होती.

दरम्यान, क्षेत्रीय अध्यक्षांना यापुर्वी दहा लाख रुपयांच्या विकास कामांना मंजूरी देत होते. परंतू, काही कालातंराने ते अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यामुळे नामधारी असलेल्या क्षेत्रीय अध्यक्षांकडून नागरी सुविधांची कामे करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे क्षेत्रीय अध्यक्षांना पु्न्हा दहा लाख रुपयापर्यंत आर्थिक अधिकार देण्यात यावे, अशा सुचना महापाैरांनी क्षेत्रीय अध्यक्षाच्या बैठकीत दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button