breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थेट अनुदान देण्यास भाजप कार्यकर्त्यांचा आक्षेप ; मुख्यमंत्र्याकडे तक्रार 

यशवंतराव चव्हाण स्मारक समितीचे अनुदान आयुक्तांनी थांबविले.
पिंपरी ( महा ई न्यूज ) – निगडी येथील कै.यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला एका आमदारांच्या सांगण्यावरुन तब्बल पाच कोटी रुपये थेट पध्दतीने अनुदान देण्यास स्थायीसह महासभेने मान्यता दिली. हे अनुदान देण्यास भाजपचे सचिन काळभोर यांनी आक्षेप नोंदविला असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यासह ‘आपलं सरकार’ यावर तक्रार दाखल करण्यात आलीय. त्यामुळे यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला दिला जाणारा अनुदानाचा चेक आयुक्तांना थांबवून ठेवला आहे.
कै. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीमार्फत निगडी येथे कै. यशवंतराव चव्हाण यांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार आहे. यामध्ये गोर-गरिब, अनाथ व अपंगासाठी अभ्यासिका, वस्तीगृह, सांस्कृतिक भवन, ग्रंथालय व वाचनालय, व्यायामशाळा, आयुर्वेदिक उपचार केंद्र, कॉन्फरन्स हॉल बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पिंपरी महापालिकेतर्फे आर्थिक मदत करण्याची विनंती यशवंतराव स्मारक समितीने केली होती. त्यानुसार महापालिका पाच कोटी रुपयांची मदत करणार असून त्याला स्थायी समितीसह महासभेने मान्यता दिली.
याबाबत भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते असलेले सचिन काळबोर यांनी कै.यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला थेट पध्दतीने पाच कोटी रुपये अनुदान देण्यावर आक्षेप नोंदविला आहे.  तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह आपलं सरकार यावर तक्रार करुन अनुदान देण्यात येवू नये, असे म्हटले आहे.  तसेच महापालिकेने कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय उभारले आहे. त्या रुग्णालयातून शहरासह आसपासच्या नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. तेथील रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्यास व आराम करण्यास प्रशासनाने कोणतीही सोय केलेली नाही. ते अनुदान स्मारक समितीला न देता त्या रकमेतून रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्यासाठी सुसज्ज इमारत उभी करावी, तसेच रुग्णालय अजून अद्यावत करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी पिंपरी चिंचवडकरांच्या करदात्यांचा पैशाची उधळपट्टी न करता त्यांचा नागरिकांच्या हितासाठी खर्ची करावा, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल, परंतू,  कै.यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला हे अनुदान देण्यात येवू नये, तसेच महापालिकेने हे अनुदान दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे सचिन काळभोर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button