breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थायलंड येथून परतलेल्या 90 लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी, आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आदेश

  • भोसरीच्या विवाह सोहळ्यातील प्रवाशांवर आले गडांतर
  • या प्रवाशांना ‘होम बेस्ड क्वारंटाईन’ होण्याच्या दिल्या सूचना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भोसरीतील एका प्रतिष्ठीत घरातील विवाह सोहळा साजरा करण्यासाठी थायलंड येथे जाऊन परतलेल्या 90 लोकांची अद्याप कसल्याच प्रकारची तपासणी झालेली नाही. लग्नाच्या व-हाडातील व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाल्याची खातरजमा करण्याची तसदी देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने घेतलेली नाही. जर, यातील काहींना करोनाचा संसर्ग झाला असेल तर त्यांची आरोग्य तपासणी होऊन करोनाचा संसर्ग त्यांच्यापर्यंत सिमित ठेवणे उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या प्रवाशांना घरातच पण विभक्त (होम बेस्ड क्वारंटाईन) राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचे पाच संशयीत रुग्ण आढळले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करून थ्रोट सॅम्पल परिक्षण करण्यासाठी पाठविण्यात आले होते. आज त्या पाचहीजणांचा परिक्षण अहवाल प्राप्त झाला. त्यातील तीनजणांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. ही शहरासाठी धक्कादायक बाब आहे. हे रुग्ण दुबई येथून पिंपरी-चिंचवडमध्ये आल्याने करोनाचा विषाणू त्यांच्यामार्फत शहरात दाखल झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन विभागात उपचार सुरू आहेत. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेचा विद्यकीय विभाग कसोशिने प्रयत्न करत आहे. मात्र, नुकतेच परदेशात विवाह सोहळा साजरा करून शहरात परतलेल्या 90 हून अधिक लोकांचा या विभागाला साधा पत्ता देखील नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे.

भोसरीत राहणा-या एका कुटुंबातील विवाह सोहळा थायलंड येथे आयोजित केला होता. या विवाह सोहळ्यासाठी भोसरी परिसरातील 90 हून अधिक व-हाडी मंडळी विमानाने थायलंड येथे पोहोचली. विवाह सोहळा उरकल्यानंतर ते दोन दिवसांपूर्वी विमानाने शहरात परतले आहेत. त्यांचा विमानतळावर अनेकांशी संपर्क आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून करोना विषाणुचा फैलाव तर झाला नाही ना, असा संशय बळावत चालला आहे. त्याची चर्चा पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू आहे. पालिकेच्या वैद्यकीय विभागाने त्यांची चौकशी करण्याची तसदी देखील घेतलेली नाही. त्यांची चौकशी होऊन वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. जर, त्यातील काहींना करोना विषाणुंची बाधा पोहोचली असेल तर त्यांना वेळीच योग्य उपचार मिळणे गरजेचे आहे. शिवय, ते नागरिक शहरात कोणत्या ठिकाणी फिरत आहेत, हे सांगणे कठीण आहे. याची चौकशी करून तपासणी होण्याची गरज आहे. अन्यथा त्यांच्या माध्यमातून या विषाणुचा शहरात प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

संबंधित कुटुंब प्रमुखांशी यासंदर्भात चर्चा झाली. त्यांच्याकडून प्रवाशांची माहिती मागवली आहे. प्रवासाचे टप्पे तपासून पुढील कार्यवाही करण्यात येईल. तोपर्यंत विवाह सोहळा साजरा करण्यासाठी विदेशी गेलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबामध्ये ”होम बेस्ड कॉरंटाईन” (घरातील इतर सदस्यांपासून विभक्त) करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तपासणी होईपर्यंत त्यांना कोणाच्याही संपर्कात जाता येणार नाही.

आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button